अ.भा. छावा संघटनेकडून छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा

पंढरपूर LIVE 16 जानेवारी 2019



पंढरपूर (प्रतिनिधी):- आज दि. 16 जानेवारी 2019 रोजी दरवर्षी प्रमाणे अ.भा. छावा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त रक्तदान शिबीराचेही आयोजन केलं होत. प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले.

अ.भा.छावा मराठा युवा संघटन पंढरपुर शहर शहराच्या वतीने आयोजित केलेल्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी सालाबादप्रमाणे पाच विविध नद्यांचे पाणी आणण्यात आले होते. दुर्गराज रायगड येथील गंगासागर तलावातील पाणीही आणण्यात आले होते. सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास दुध, दही, मध, लोणी, तुप आदी पंचामृताने अभिषेक घालण्यात आला. यानंतर पंचनद्यांच्या जलासह दुर्गराज रायगड येथील गंगासागर तलावातील जलाने अभिषेक घालण्यात आला. पंढरपुरातील प्रसिध्द छायाचित्रकार बशीर शेख व समाजसेवक विष्णु शेटे यांच्या हस्ते  पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.  

छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संत दामाजी मठ येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अ.भा.छावा मराठा युवा संघटनचे आय.टी प.महाराष्ट्र अध्यक्ष सागरदादा कदम यांच्या शुभहस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेकांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. रक्तदात्यांच्या सुरक्षेसाठी आयोजकांकडुन प्रत्येक रक्तदात्यांना हेल्मेट भेट देण्याचं अनोखं नियोजन करण्यात आलं होते. पंढरपुर शहर वाहतुक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सारंग चव्हाण व पो.ना. गजानन माळी यांच्या हस्ते रक्तदात्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले.



हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी छावा चे शहराध्यक्ष सतिश माने, उपाध्यक्ष गणेश जाधव, सचिव गणेश थिटे, संघटक निलेश कदम, युवक शहराध्यक्ष निलेश कोरके, जिल्हा उपाध्यक्ष प्रणव राऊत, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष ओंकार चव्हाण, विठ्ठल भुमकर, गणेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.
या वेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष संदिप मांडवे, छावा चे आय.टी.विभाग जिल्हाध्यक्ष बालाजी माने, बाळासाहेब गोडबोले, तालुका अध्यक्ष गणेश सावंत, शेखर भोसले, माऊली साठे, सागर चव्हाण, काकासाहेब यादव, सोपानकाका देशमुख, स्वप्निल गायकवाड, सुमीत शिंदे, आकाश पवार, प्रमोद गुंड, कुणाल गुंड आदी उपस्थित होते. 

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com