विविध शालेय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले-प्रा.एस.के.पाटील

पंढरपूर LIVE 20 जानेवारी 2019


सांगोला कन्या प्रशालेत पारितोषिक वितरण समारंभ 
सांगोला(प्रतिनिधी):-विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांनी स्वत: बदलले पाहिजे. प्रशालेत दररोज नवनवीन ज्ञान आत्मसात करावे. त्याचा विद्यार्थ्यांनी परिपूर्ण, पुरेपूर ङ्गायदा घ्यावा. कन्या प्रशालेतील विविध उपक्रमांमुळेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाल्याचे सांगितले. जो विद्यार्थी शालेय जीवनात प्रचंड मेहनत घेतो तो कधीही अयशस्वी होत नाही. त्याकरिता विद्यार्थ्यांनी सकारात्मक एक पाऊल पुढे टाकावे. याकरिता ही संस्था राबवीत असलेली उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार सिंहगड बी.एड.कॉलेजचे प्राचार्य एस.के. पाटील यांनी यावेळी केले. ते सांगोला येथील कन्या प्रशालेने आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभावेळी बोलत होते.


सुरुवातीस संस्थापक कै.वामनराव शिंदे, सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व द्विपप्रज्वलनाने करण्यात आली. गुरुवारी विद्यार्थी शिक्षक दिन व ङ्गनङ्गेअर कार्यक्रम तसेच शुक्रवारी शेलापागोटे व  सांस्कृतिक कलाविष्कार कार्यक्रमाने रंगत आणली. 
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे इनरव्हीलच्या अध्यक्षा मंगल लाटणे, सचिव अश्‍विनी कांबळे, स्वातंत्र्य सैनिक मोहिते सर, संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे, सचिव निलकंठ शिंदे सर, प्रमिला जगदाळे, विद्यार्थी प्रतिनिधी कु.सौरभ उबाळे, महविश शेख, उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या कालावधीत  घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ वरील मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे तर सुत्रसंचलन सुवर्णा इंगवले मॅडम यांनी केले. कार्यक्रम  यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com