पंढरपूर तालुक्यातील कोर्टी ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंच कु.नगीना बशीर मुलाणी यांचा पंढरपूर लाईव्ह कार्यालयात सत्कार

पंढरपूर LIVE 19 जानेवारी 2019


पंढरपूर तालुक्यातील कोर्टी ग्रामपंचायतीच्या  नुतन सरपंच कु.नगीना बशीर मुलाणी यांचा पंढरपूर लाईव्ह कार्यालयात सत्कार करण्यात आला. आ.भारतनाना भालके यांच्या गटाकडून सरपंचपदी निवड झालेल्या कु.नगीना बशीर मुलाणी यांना सोलापूर जिल्ह्यातील सर्वात प्रथम कमी वयाच्या उच्चशिक्षीत सरपंच झाल्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोलापूर जिल्ह्याचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुुशीलकुमार शिंदे, खा.विजयसिंह मोहिते पाटील, पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आ.भारतनाना भालके, सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष नागेश फाटे, मोहोळ चे समाजसेवक तथा व्हीएनएस ग्रुपचे संचालक संतोष वायचळ, विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक द्रोणाचार्य हाके यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचा सत्कार केला जात आहे.

आज पंढरपूर लाईव्ह कार्यालयात पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हीएनएस ग्रुपचे व्यवस्थापक राजुभाई मुलाणी, राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम मुलाणी, सुभेदार बशीर मुलाणी, मोहसीन मुलाणी, सादीक मुलाणी आदींसह मुलाणी परिवारातील सदस्य उपस्थित होते. 

कोर्टी गाव हे पंढरपूर शहराच्या अगदी जवळचे गाव असल्याने या गावचा सर्वांगीन विकास झपाट्याने होणे आवश्यक आहे. गावातील ग्रामस्थांच्या मुलभुत गरजा पुर्ण करुन सर्व सोयी-सुविधा तत्परतेने पुरवण्याकडे सर्वप्रथम लक्ष देऊन वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहु. व सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवुन सरपंचपदाचा कार्यभार प्रामाणिकपणे पार पाडु. असा विश्‍वास यावेळी नुतन सरपंच नगीना मुलाणी यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना व्यक्त केला.  








महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com