जुगारावर लाखो रू. उधळणारे अन त्यांचे संसार देशोधडीला लावणारे मतलबी!!! यांचेवर SP विरेश प्रभुंचा चाप!
पंढरपूर : प्रतिनिधी
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पथकाने टाकलेल्या धाडी मध्ये ४८ जणांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले आहे. २ लाख ८० हजार रुपये रोख आणि २४ मोटार सायकलीसह ४ चारचाकी गाड्या अटक करण्यात आलेल्यांकडून जप्त केल्या आहेत. आषाढीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
रविवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास सांगोला मार्गावर कासेगाव (ता पंढरपूर) हद्दीत बायपास जवळच्या हॉटेल पंचरत्नवर पोलिसांनी धाडक टाकून ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल ३० ते ३५ लाख रूपये किमतीचा असल्याची प्राथमिक माहिती आहे.
याबाबत पोलिस अधिक तपास करित आहेत.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111