करमणूककराला ‘जीएसटी’चा फटका
पुणे : येत्या १ जुलैैपासून देशात जीएसटी प्रणाली लागू होणार आहे. यामुळे शासनाला वर्षांला कोट्यवधी रुपयांचा करमणूक कर वसूल करून देणारा हा विभागच बंद होणार आहे. करमणूक कराचा यापुढे वस्तू व सेवा करामध्ये (जीएसटी) समावेश होणार असल्याने करमणूक कर विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
महसूल विभागाच्या वतीने करमणूक कर, गौण खनिज, जमीन महसूल या सारखे विविध कर वसूल केले जातात. पुणे विभागात एकट्या करमणूक कर विभागाकडून दर वर्षी सुमारे २०० ते २५० कोटींची कर वसूली केली जाते. या विभागाच्या वतीने प्रामुख्याने चित्रपटगृहे, व्हिडीओ सिनेमा, केबल, डीटीएच, व्हिडीओ गेम, वॉटर पार्क आदी विविध माध्यमातून कर वसूली केली जाते. पुणे विभागात उपायुक्त, तहसिलदार, नायब तहसिलदार, अव्वल कारकून लिपिक अशी सुमारे १०६ अधिकारी, कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. जीएसटीमुळे यापुुढे करमणूक करा ऐवजी सेवा कर आकारला जाणार आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111