कुणाला मिळणार कर्जमाफी ? कुणाला नाही मिळणार?
फोटो संग्रहित
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचं ३४ हजार २२ कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा होताच राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. आपलं कर्ज माफ झालं का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडलाय.
तर, कर्ज नेमकं कुणा-कुणाला माफ झालं, वाचा…
-१ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयेपर्यंतचं कर्ज सरसकट माफ
-ज्या शेतकऱ्यांचं दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकीत आहे त्यांच्यासाठी सरकार वन टाईम सेटलमेंट योजना राबवणार, या योजनेत थकबाकी रकमेच्या २५ टक्के किंवा दीड लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम माफ करण्यात येईल.
उदा. एखाद्या शेतकऱ्याचे ४ लाख रुपये कर्ज थकीत असेल तर त्याला १ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात येईल. आणि एखाद्या शेतकऱ्याचे ८ लाख रुपये कर्ज थकीत असेल तर त्याला दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात येईल.
-२०१२ ते २०१६ या चार वर्षांत ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले, परंतु ३० जून २०१६ रोजी ते थकबाकीदार असतील अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार
-ज्या शेतकऱ्यांनी मुदतीत कर्ज फेडले त्यांना प्रोत्साहन म्हणून पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येईल.
उदा- ज्या शेतकऱ्याने १ लाख रुपयांचं कर्ज मुदतीत फेडलं त्या शेतकऱ्याला १५ हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येईल
कुणा-कुणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही?-
-राज्यातील आजी-माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य यांना कर्जमाफी नाही
-केंद्र आणि राज्य सरकारचे तसेच निमशासकीय संस्था आणि अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या कर्जमाफीसाठी पात्र नाहीत
-करदाते आणि व्हॅट भरणाऱ्या व्यापाऱ्यांनाही कर्जमाफीतून वगळण्यात आलंय
– चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार नाही
कर्जमाफी कुणाला मिळणार आणि कुणाला नाही मिळणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत, ते दूर करण्यासाठी ही बातमी शेअर करायला विसरु नका…

.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111