श्रीक्षेत्र वीर येथे सोपानाकाकांचे उत्साही स्वागत



वाल्हे-श्रीक्षेत्र वीर येथे संतश्रेष्ठ श्री सोपानकाका पालखी सोहळ्याचे वीर देवस्थान व ग्रामस्थांकडून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. दुपारच्या विसाव्यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
निसर्गरम्य वातावार्नात श्री संतश्रेष्ठ सोपानकाकानांचा पालाखी सोहळा हिरव्या रानातून पांगारे गावाचा निरोप घेऊन पंढरीच्या वाटेने निघाला यावेळी यादववाडीसह अन्य गावाच्या नागरिकांनी येथे पालखी सोहळ्याचे उत्साही स्वागत केले. विठूरायाच्या भेटीस निघालेल्या श्री सोपानकाका पालखी सोहळ्याचे सकाळच्या प्रहरी पांगारेहून प्रस्थान झाले. यावेळी टाळमृदंगाच्या गजरात ज्ञानोबा माउलींचा जयघोष करत वैष्णवभक्‍तांचामेळा परींचे येथे न्याहरीसाठी विसावला. यावेळी येथील ग्रामस्थांनी देखील सोहळ्याचे स्वागत करून संतश्रेष्ठ सोपानकाकांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी चढाओढ केली. त्यानंतर पालखी सोहळा हळूहळू
श्रीक्षेत्र वीरकडे मार्गस्थ झाला. दुपारी सव्वादोनच्या सुमारास पालखी सोहळा श्रीक्षेत्र वीरच्या वेशीवर दाखल झाला, तर सोहळा श्रीम्हस्कोबा मंदिरानजीक येताच ग्रामस्थांनी मानिभावी सोहळ्याचे स्वागत केले. ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करूनच संतश्रेष्ठ श्री सोपानकाका पालखी रथाचे स्वागत करून दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी पालखी सोहळ्यासह सोहळा प्रमुख ऍड. गोपाळ गोसावी, चोपदार मनोहर रणनवरे, उत्तम बोरडे, दादा नवघणे यांचा देखील सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी गावच्या सरपंच मालन चवरे, उपसरपंच प्रतापराव धुमाळ, श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, उपाध्यक्ष संभाजी धुमाळ, सचिव तय्यब मुलाणी, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोरे, सुभाष समगीर, गणेश मोरे, राजेंद्र धुमाळ आदि मान्यवर उपस्थित होते. दुपारच्या न्ह्यारीनंतर पालखी सोहळा मुक्कामी मांडकी गावाकडे प्रस्थान झाला. मांडकी गावाचे सरपंच सतीश जगताप यांनी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी मानसिंग जगताप, विश्‍वास जगताप, तानाजी जगताप, बाबा शिंदे यांनी पालखीचे स्वागत केले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
श्रीक्षेत्र वीर येथे श्री सोपानकाका पालखी सोहळा दुपारचा विसावा घेऊन मांडकी येथे मुक्कामासाठी मार्गस्थ होणार असल्याने येथील विविध सामाजिक संस्थांकडून वारकऱ्यांना अल्पोहार तसेच दुधाचे मोफत वाटप करण्यात आले, तर श्रीम्हस्कोबा देवस्थानच्या वतीने लाडू चिवडा वाटण्यात आला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने देखील वारकऱ्यांना आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे पुरवली असून पोलिसांचाही चोख बंदोबस्त असल्याचे पहावयास मिळाले आहे.
.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111