बारामतीतील पालकांचे डोळे झाले पांढरे


बारामती- पुणे शहरा पाठोपाठ शैक्षणिक हब म्हणुन बारामतीची ओळख आहे. देश तसेच राज्यभरातील विद्यार्थी बारामती येथे शिक्षण घेत आहेत. मात्र, चालु शैक्षणिक वर्षाचा विद्यार्थ्यांवर होणारा खर्च पाहुन पालकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. प्रवेश शुल्क तसेच पाठ्यपुस्तकांच्या भरमसाठ वाढलेल्या कीमती पालकांच्या आवाक्‍याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. खासगी संस्थांनी चालवलेल्या मनमानी करभारा विरोधात पालकांनी आवाज उठवला आहे. चालु शैक्षणिक वर्षातील फी वाढीला हरकत घेत, फी कमी करण्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक, गटशिक्षण अधिकारी तसेच थेट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना देखील पालकांनी निवेदन दिले आहे.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर शाळेच्या फी वाढीस पालकांनी हरकत घेतली आहे. पालक व शिक्षकसंघाने पालकांशी कोणत्याही प्रकारची चर्चा तसेच संवाद केला नाही. त्यामुळे फी वाढीचा घेतलेला निर्णय मान्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 2011 च्या कलम 4 च्या पोट कलम (1) चे उल्लंघन केले जात आहे. पालक व शिक्षक संघ स्थापन झालेल्या सुचना फलकावर तसेच शाळेच्य संकेतस्थळावर उपलब्ध नाहित. शुल्क वाढ करताना कार्यकारी समितीसमोर सहा महिने आधी विषय आणणे गरजेचे होते. आशाप्रकारे कायदेशीर बाबींना बगल देऊन केलेली फी वाढ आम्हाला मान्य नाही अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. त्याबातचे निवेदन शाळेच्या मुख्याध्यापकाना तसेच संस्थेचे उपाध्यक्षांना देण्यात आले आहे. त्याची प्रत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना देखील पाठवली आहे. त्यामुळे पालकांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे शिणसंस्था फी कमी करणार का हा खरा प्रश्‍न आहे.

.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111