‘डॅडी’ बघून डॉन अरुण गवळीने म्हटले, जरा जास्तच झाले!

अर्जुन रामपाल स्टारर ‘डॅडी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. गँगस्टर अरुण गवळी याच्या आयुष्यावर आधारित असलेला हा चित्रपट खºयाखुºया डॅडीने बघितला असून, त्याने त्यावर ‘जरा जास्तच झाले’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच अभिनेता अर्जुन रामपाल स्टारर ‘डॅडी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. गँगस्टर अरुण गवळी याच्या आयुष्यावर आधारित असलेला हा चित्रपट खºयाखुºया डॅडीने बघितला असून, त्याने त्यावर ‘जरा जास्तच झाले’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मिस लव्हली’सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे असीम अहलुवालिया यांनी ‘डॅडी’चे दिग्दर्शन केले.
दरम्यान, अर्जुन रामपाल याने पीटीआयशी बोलताना म्हटले की, हा चित्रपट बघितल्यानंतर लोकांना अरुण गवळीचे आयुष्य समजून घेण्यास मदत होईल. असीम या चित्रपटाच्या माध्यमातून असे काही करू इच्छितो ज्यामुळे लोकांना डॉनचे आयुष्य समजण्यास मदत होईल. या चित्रपटातून आम्ही कोणाचीही बाजू घेणार नाही. हा चित्रपटातून केवळ वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अरुण गवळीच्या वास्तविक जीवनातील घटना चित्रपटात उकरून काढल्या जाणार असल्याचेही अर्जुनने स्पष्ट केले.

पुढे बोलताना अर्जुनने म्हटले की, हा चित्रपट अरुण गवळी आणि त्याच्या परिवाराने बघितला आहे. परिवारातील सर्वच सदस्य चित्रपट बघून खूश आहेत. हा चित्रपट बºयाच रहस्यांवरून पडदा उचलणार असल्याने अरुण गवळीने चित्रपट बघताच ‘जरा जास्तच झाले’ अशाप्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले तेव्हा अरुण गवळीने लोकांच्या प्रतिक्रियांचा अंदाज घेतला. त्यावरून हा चित्रपट हिट होईल अशी त्याला अपेक्षा आहे.
दरम्यान, हा चित्रपट पुढच्या महिन्याच्या २१ तारखेला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला मिळत असलेला प्रतिसाद पाहता चित्रपटालाही प्रेक्षकांकडून पसंंती मिळेल असेच काहीसे वाटत आहे. आता या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रतीक्षा असून, बॉक्स आॅफिसवर गॅँगस्टर फॉर्म्युला पुन्हा एकदा यशस्वी होतो की नाही हे बघणे मजेशीर ठरेल. 

.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111