भारतीय तरुणाच्या ६४ ग्रॅम वजनाच्या उपग्रहाचे प्रक्षेपण!


नवी दिल्ली, २२ जून
१८ वर्षांचा भारतीय मुलगा रिफत शाहरूख याने तयार केलेल्या जगातील सगळ्यात हलक्या अशा अवघ्या ६४ ग्रॅम वजनाच्या उपग्रहाचे ‘नासा’ने आज यशस्वी प्रक्षेपण केले. त्याने ‘कलामसॅट’ नावाचा उपग्रह तयार केला होता. नासा आणि ‘आय डूडल लर्निंग’ने आयोजित केलेल्या ‘क्युब इन स्पेस’ या स्पर्धेत तो सहभागी झाला होता आणि या स्पर्धेसाठी त्याने ठोकळ्याचा आकाराचा उपग्रह तयार केला होता. जानेवारी महिन्यात रिफतने हा उपग्रह नासाकडे सुपूर्द केला.
जगातील अनेक उपग्रहांवर अभ्यास करण्यात आल्यावर रिफतने बनवलेला उपग्रह सर्वात हलका आणि लहान असल्याचे नासाने म्हटले आहे, तेव्हा हा उपग्रह जूनमध्ये प्रक्षेपित करणार असल्याची माहिती नासाने मे महिन्यात दिली होती. २४० मिनिटांची ही प्रक्षेपण मोहिम असून तो १२ मिनिटे अंतराळाच्या कक्षेत ‘कलामसॅट’ भ्रमण करणार आहे.
शाळेत असतानाच रिफतमध्ये विज्ञानाची आवड निर्माण झाली होती. रिफतचे वडील स्वत: वैज्ञानिक होते तेव्हा हे बाळकडू त्याला वडिलांकडून मिळाले. लहानपणी वडिलांना सतत प्रयोगशाळेत काम करताना मी पाहायचो. त्यांच्यासारखे वैज्ञानिक बनवण्याचे माझे स्वप्न होते. आज ते स्वप्न पूर्ण झाले असेही रिफतही म्हणाला. (वृत्तसंस्था)
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111