निवडणूक अटळ
मीराकुमार विरोधकांच्या संयुक्त उमेदवार
नवी दिल्ली, २२ जून
कॉंग्रेसच्या नेतृत्वातील विरोधी पक्षांच्या आघाडीने आज माजी केंद्रीय मंत्री आणि लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार यांची राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यामुळे रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याशी त्यांची लढत अटळ आहे.
विरोधकांची भूमिका ठरवण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून मीराकुमार यांची एकमताने निवड करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीराकुमार यांचे नाव सूचवले आणि सर्वांनी या नावाला अनुमती दिली. सोनिया गांधी यांनी मीराकुमार यांच्या नावाची घोषणा केली. २७ जूनला मीराकुमार उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यामुळे विरोधी पक्षात फूट पडली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत होणार्या बैठकीत कोणता निर्णय होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मीराकुमार यांच्या निवडीमुळे राष्ट्रपतिपदासाठी दलित पुरुष विरुद्ध दलित महिला अशी लढत होणार आहे.
मीराकुमार यांच्या उमेदवारीला बसपाचे सतीशचंद्र मिश्रा यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांतर्फे मीराकुमार यांच्याशिवाय सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खडगे, प्रकाश आंबेडकर, भालचंद्र मुणगेकर आणि गोपालकृष्ण गांधी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र मुळच्या बिहारच्या असलेल्या मीराकुमार यांच्या नावावर एकमत झाले. कॉंग्रेसचा दलित चेहरा असलेल्या मीराकुमार माजी उपपंतप्रधान जगजीवनराम यांच्या कन्या आहेत. त्या पाचवेळा लोकसभेच्या सदस्य राहिलेल्या आहेत. बुधवारी सायंकाळी त्यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळे त्या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार राहतील, हे स्पष्ट झाले होते.
आजच्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. ऍण्टोनी, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, प्रफुल्ल पटेल, तारिक अन्वर, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, आरएसपीचे प्रेमचंद्रन, द्रमुकच्या कनिमोझी, झामुमोचे हेमंत सोरेन, जेडीएसचे दानिश अली खान, मुस्लिम लीगचे कुंजली कुट्टी, राजदचे लालूप्रसाद यादव, जयप्रकाश नारायण यादव, बसपाचे सतीशचंद्र मिश्रा, तृणमूल कॉंग्रेसचे डेरेक ओ ब्रायन, केरळ कॉंग्रेसचे जॉर्ज मनी, सपाचे रामगोपाल यादव, नरेश अग्रवाल, राष्ट्रीय लोकदलाचे अजितसिंह, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे नेते उपस्थित होते.
या बैठकीच्या आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी बोलावली होती. त्यानंतर कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल तसेच माकपचे सीताराम येचुरी यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.
कोविंद आज अर्ज भरणार;भाजपा दाखवणार बाहुबळ

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची व्यूहरचना भाजपाने आखली आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता संसदभवन परिसरातील बालयोगी ऑडिटोरियममध्ये कोविंद आपला उमेदवारी अर्ज सादर करतील. २८ जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तिथी आहे. १७ जुलैला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी कोविंद यांनी बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे
उमेदवारी अर्ज सादर करतांना रामनाथ कोविंद यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व घटकपक्षांचे प्रमुख नेते, भाजपाशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री तसेच विविध राज्यातील खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकण्यासाठी जेवढे संख्याबळ आवश्यक आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त संख्याबळ भाजपाजवळ आहे.
रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर कॉंग्रेस, अण्णाद्रमुक, पीडीपी, बिजू जनता दल आणि जनता दल युनायटेडने पाठिंबा दिला आहे. पाठिंबा देणार्या पक्षाच्या नेत्यांनी तसेच संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाने केले आहे. त्यानुसार तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (तभा वृत्तसेवा)
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111