लाचखोर सरपंच गजाआड


नागपूर, २२ जून
ना-हरकत प्रमाणपत्रासाठी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून एक हजाराची लाच घेणार्‍या लाव्हा ग्रामपंचायतच्या सरपंच जिजाबाई धुर्वे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदार व्यावसायिकाचे लाव्हा येथे ट्रान्सपोर्ट कार्यालय आहे. त्यांना जीएसटी नंबर मिळविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी त्यांनी लाव्हा ग्रामपंचायत कार्यालयाकडे अर्जही केला होता. परंतु, त्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही. तक्रारदाराने सरपंच धुर्वे यांची भेट घेतली असता, त्यांनी एक हजाराची मागणी केली. मात्र, तक्रारदाराने नंतर एसीबीकडे तक्रार केली.
या तक्रारीवरून गुरुवारी दुपारी लाव्हा ग्रामपंचायत कार्यालयाभोवती सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून एक हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने आरोपी महिलेस रंगेहात पकडले. याप्रकरणी वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून जिजाबाई धुर्वे यांना अटक करण्यात आली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111