पालखी मुक्कामाच्या ठिकाणासह पंढरपूरात मद्य विक्रीस मनाई



सोलापूर दि.23 :-  आषाढी यात्रा पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 मधील कलम 142 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार पंढरपूर शहर व पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची सर्व मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार पंढरपूर शहरात आषाढी एकादिशी निमित्त दिनांक 3 जुलै ते 5 जुलै 2017 या कालावधतीत सर्व मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद ठेवावीत. तसेच दिनांक 8 ते 9 जुलै 2017 कालावधीत पंढरपूर शहरात सायंकाळी 5 नंतर  मद्य विक्री दुकाने बंद ठेवावीत.

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दिनांक 28 जून 2017 रोजी- नातेपुते, दिनांक 29 जून 2017 रोजी  माळशिरस, अकलूज, दिनांक 30 जून 2017 रोजी वेळापूर, बोरगाव, श्रीपूर, माळीनगर, दिनांक 1 जुलै 2017 रोजी भंडशेगाव, पिराची कुरोली आणि दिनांक  2 जुलै 2017 रोजी वाखरी येथील सर्व मद्य विक्री अनुज्ञप्ती पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच आषाढी यात्रेच्या अनुषंगाने दिनांक 3  ते 5 जुलै 2017 या कालावधीत पंढरपूर शहरापासून            5 कि.मी. परिसरातील देशी, विदेशी मद्य विक्री परवाना कक्ष अनुज्ञप्ती पूर्ण दिवस आणि दिनांक 8 ते 9 जुलै 2017 कालावधीत सायंकाळी 5 वाजेनंतर बंद ठेवावीत, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आदेशात नमूद केले आहे









.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111