मिताली राजने पत्रकाराची बोलतीच केली बंद


नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आपल्या दमदार फलंदाजीसह हजरजबाबीपणासाठीही ओळखली जाते. नुकत्याच बंगळूरुमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान तिने आपल्या उत्तराने पत्रकाराची बोलतीच बंद केली.


एका कार्यक्रमादरम्यान एका पत्रकाराने मितालीला भारत आणि पाकिस्तानच्या संघातील आवडता क्रिकेटर कोण आहे असा प्रश्न विचारला.
यावर उत्तर देताना मिताली म्हणाली, तुम्ही पुरुष क्रिकेटरर्सनाही हा प्रश्न कधी विचारता का? तुम्ही त्यांना विचारता का की महिला क्रिकेटरर्समधील तुमची आवडती क्रिकेटर कोण आहे? मला हा प्रश्न नेहमी विचारला जातो. पुरुष क्रिकेटर्सनाही असे प्रश्न विचारले गेले पाहिजेत.
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना २४ जूनला इंग्लंडविरुद्ध होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!




सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111