योग भारतीय संस्कृतीने दिलेली अमूल्य देणगी - महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे
डोंगरीच्या निरिक्षण गृहात साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उमरखाडी, डोंगरी येथील निरीक्षण गृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे आयुक्त कमलाकर फंड यांच्यासह योग प्रशिक्षक, चिल्ड्रन एड् सोसायटीचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, शारीरिक व मानसिक आरोग्याचे निवारण होण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे असा सल्ला अनेक योग अभ्यासक देतात. रोग निवारण्याच्या या पध्दतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. संयुक्त राष्ट्राने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. मानवाला आपले ध्येय, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शरीर सदृढ ठेवणे गरजेचे असते. यामुळे नियमित योग करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. एक तास नियमित योग करण्याचा संकल्प आजपासून केला असल्याचे श्रीमती मुंडे म्हणाल्या.
या प्रसंगी मंत्री मुंडे यांनी निरीक्षण गृहातील मुलां मुलींसोबत योग साधनेच्या कपाल भाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी, भसरीका, ओम ध्यान तसेच ताडासन, वृक्षासन आदि आसनेही केली. यावेळी मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते सर्व निरीक्षण गृहातील मुलां मुलींना फळवाटप करुन योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111