चोर म्‍हणतो, हा अल्‍लाह अन् माझ्यातला मामला!


चंदिगड : वृत्तसंस्‍था
कोणतेही संकट आले की माणूस ईश्‍वराचा धावा करतो. संकटात ईश्‍वर, येशू, अल्‍लाह आपल्या मदतीला येणार अशी माणसाची श्रद्‍धा असते. मात्र गरज पडली तर काहीवेळा चोरीचाही मार्ग काहीजणांकडून अवलंबला जातो. मात्र एका मशिदीत चोरी करणार्‍या चोराने मशिदीत ठेवलेली चिठ्‍ठी वाचून आपण अचंबित व्‍हाल. "हा मामला अल्‍लाह आणि माझ्यातील आहे. यात कोणी दखल घेऊ नये, असे चोराने चिठ्‍ठीत म्‍हटले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
पाकिस्‍तानातील दक्षिण पंजाबमधील खानेवाल जिल्‍ह्यात एका मशिदीमध्ये चोरी झाल्याची घटना घडली. जामिया मशिद सादीकुद मेदिना येथे शुक्रवारी रात्री चोरी झाली. चोराने ५० हजार रुपये लंपास केले. सोबतच मशिदीत एक चिठ्‍ठी ठेवून तो पसार झाला. या चिठ्‍ठीमध्ये त्याने,"हा माझ्या आणि अल्‍लाह यांच्यामधील मामला आहे. यामध्ये कोणीही दखल देऊ नये, असे म्‍हटले आहे.
तसेच, "मी खूपच गरजू व्यक्ती आहे, म्हणून मी मशिदीमध्ये चोरी करीत आहे. मैालवीकडे मी मदत मागितली होती. परंतु, त्यांनी मदत द्यायला नकार दिला आणि मला मशिदीमधून बाहेर काढण्यात आले. तसेच लोकांकडून कोणतीच मदत मिळाली नाही. म्हणून मी हे पाऊल उचलले आहे. असेही चोराने चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे.
व्यक्तीची गरज लक्षात घेऊन त्या व्यक्तीला माफ करण्यात यावे, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111