‘स्मार्ट सिटी’कार्यक्रम आता २९ जूनला होणार


सोलापूर : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटी योजनेच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त 25 जून रोजीच्या नियोजित कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे. आता हा कार्यकम 29 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतून होणार आहे. 
सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीची नुकतीच सभा पार पडली होती. त्यात सोलापुरात स्मार्ट सिटी योजनेच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त रंगभवन ते डॉ. आंबेडकर चौक स्मार्ट रोड कामाचे भूमिपूजन, सिद्धेश्‍वर मंदिर, एस.टी. स्टँड व महापालिका येथे स्मार्ट किऑस्क सेंटर,  सिद्धेश्‍वर मंदिरासमोर, साखर पेठेतील अग्‍निशमन केंद्राजवळ, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार, मनपाचे आवार, जिल्हा सत्र न्यायालयाचे आवार अशा एकूण पाच ठिकाणी प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण 10 ई-टॉयलेट, मनपा आवारातील ओपन जिमचा लोकार्पण सोहळा 25 जून रोजी करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, त्यात बदल करण्यात आला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सुधारित कार्यक्रमानुसार आता हा कार्यक्रम 29 जूनला करण्याचे ठरले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतून वरील कामांचे ई-भूमिपूजन तसेच ई-लोकार्पण सोहळा होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. स्मार्ट सिटीसंदर्भात दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमाला डॉ. ढाकणे यांनी शुक्रवारी हजेरी लावली होती. 
नवीन ‘सीईओ’ यांच्याविषयी उत्सुकता 
स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय तेली यांनी स्मार्ट सिटी कामाच्या जबाबदारीतून मुक्‍त करण्याची विनंती शासनाकडे केली आहे. त्यामुळे लवकरच ते या जबाबदारीतून बाहेर पडणार हे निश्‍चित आहे.  यानंतर आता  नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्‍ती होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111