आषाढी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसह शांतता आणि कायदा सुव्यवस्थेसाठी ठोस उपाययोजना- मा. विश्वास नांगरे पाटील यांची माहिती... नागरिकांसह विविध प्रशासकीय अधिकारी, वारकरी प्रतिनिधी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांशी सिंहगड इंजिनिअरींग कॉलेजमध्ये साधला सुसंवाद!
पंढरपूर Live 23 जुन 2017
आज येथील सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयात कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक मा. विश्वास नांगरे पाटील (आय.जी.) यांनी आषाढी यात्रेसंदर्भातील सुरक्षा, वाहतुक नियोजन वगैरे संदर्भात विविध प्रशासकीय अधिकारी, नगराध्यक्षा, पंढरीतील नागरिक, समाजसेवक, पत्रकार, नगरसेवक यांचेशी चर्चा केली.
यावेळी बोलताना नांगरे-पाटील म्हणाले की, वारकरी भाविकांना सर्व सोयी-सुविधा देण्यासोबतच त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. वारकर्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी पंढरपूरकरांनी सहकार्य करावे. पोलिस यंत्रणेची सर्व सुविधा व सुरक्षा पुरवण्यासंदर्भातील यंत्रणा सज्ज आहेच परंतु पोलिसांनाही प्रत्येकाने सहकार्य करणं आवश्यक आहे.
बघा व्हिडीओ...
यावेळी सोलापूर ग्रामीण चे पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.... यावेळी विरेश प्रभु यांनी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच वारकर्यांनी उपस्थित केलेल्या विविध समस्यांसंदर्भात समाधानकारक उत्तरे दिली. तसेच यात्रा कालावधीत शहरातील सुरक्षेसंदर्भात केलेल्या नियोजना संदर्भात माहिती दिली.
बघा व्हिडीओ...
यावेळी सुत्रसंचालन डीवायएसपी निखील पिंगळे यांनी केले.
यावेळी निखील पिंगळे यांनी सांगितले की, वारीच्या काळात प्रत्येक एसटी च्या पाठीमागे त्या त्या ड्रायव्हरचे क्रमांकाचे स्टीकर्स लावण्यात येणार आहेत. त्यामुळे जर एखादी एसटी रस्त्यावर उभी राहिली असेल किंवा त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असेल तर नागरिक व वारकर्यांनी संबंधीत ड्रायव्हरला तात्काळ कॉल करुन अशी एसटी तेथून हलवण्यास सांगणं सोप्प जाईल.
यावेळी काँग्रेस आयच्या आशाताई बागल, नगरसेवक संजय निंबाळकर, सतीश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघमारे, गणेश अंकुशराव, गुरुराज इनामदार, निलेश माने, शिवाजी मस्के, अर्जुनराव चव्हाण, ह.भ.प. वास्कर महाराज, नवनाथ रानगट तसेच पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांचेसह अनेकांनी विविध प्रश्नांसंदर्भात मा.नांगरे पाटील यांचेशी संवाद साधला.
पंढरपूर शहरातील बंद पडलेली सिग्नल यंत्रणा, पार्किंग प्रश्न व वाहतूक प्रश्न, वाखरी ते क्रांतीसिंह नाना पाटील चौक मार्गावरील डिव्हायडर, यात्रा कालावधीत भटुंबरे येथील अहिल्यादेवी चौक ते पंढरपूर शहर वाहतुक कोंडी, पालखी सोहळ्यातील वारकर्यांची सुविधा, पालखी सोहळा व रिंगण सोहळा पहाण्यास गेलेल्या भाविकांची व नागरिकरांची तसेच वारकर्यांची सुरक्षा, चंद्रभागेच्या पात्रातील खड्डे, मुख्यमंत्र्यांच्या महापुजेनंतरची शहरातील सुरक्षा व्यवस्था, हातगाडी वाल्यांचे अतिक्रमण, यात्रा कराळात शहरातील भाजी विक्रेत्यांना येणार्या अडचणी, यात्रा कालावधीत पाकिर्र्ंग चे बोगस पावत्या फाडण्याचे प्रकार, भंडीशेगाव पालखी तळ व रस्त्यांचा प्रश्न, बाजीराव विहीर व रिंगण सोहळ्यातील सुरक्षा, रोडलाईट प्रश्न, यात्रा कालावधीत दारुबंदी असूनही अवैधरित्या होणारी दारुविक्री, वाळवंटात होणारा वाळु उपसा, महाद्वार घाटावरील बंदोबस्त व त्यामुळे वारकर्यांना येणार्या अडचणी, चौफाळ्यात श्रीकृष्ण मंदिराजवळ एकादशी दिवशी भजन करणार्या दिंडयांची गैरसोय, नविन बसस्थानकावरील सुरक्षा व अतिक्रमणे, इंदिरा गांधी चौकातील मोठा खडड्डा आदी बाबतीत चर्चा झाली. व यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. या सर्व बाबतीची नोंद स्वत: नांगरे पाटील यांनी घेतली असून या सर्व बाबींबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
यावेळी पोलीस अधिक्षक विरेश प्रभू, पो. उपअधीक्षक मिलिंद मोहिते, डी वाय एस पी निखिल पिंगळे, पंढरपूर शहर पो. ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, ता.पो. ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. खराडे, नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले, सिंहगड कॉलेज चे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, सचिव संजय नवले, सोमनाथ नवले , नगरसेविका सौ. सुप्रिया डांगे, नगरसेवक विक्रम शिरसट, नारायण सिंघण, राष्ट्रवादीचे संकेत ढवळे, सामाजिक कार्यकर्त्या साधना राऊत, डी. राज सर्वगोड, उमेश सर्वगोड, शैलेश आगावणे, अनिकेत शिरसट, विलास साळुंखे आदींसह अनेक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111