पंढरपूर शहरातील रोडवर लावल्या जाणा-या वाहनांवर आळा बसण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेतर्फे पोलीस विभागास जामर देण्यात आले.
पंढरपूर शहर हे भारताची दक्षिण काशी म्हणुन प्रसिद्ध आहे. श्री.विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी संपुर्ण भारतातुन मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे शहरातील असणारी लोकसंख्या व यात्रेकरुंची वाहने यामुळे शहरातील वाहतुक व पार्किंग व्यवस्थेवर परिणाम होवुन शहरातील वाहतुक व्यवस्था कोलमडल्याने नागरीकांना व्यापा-यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी मा.आमदार प्रशांतराव परिचारक यांनी पुढाकार घेवुन पोलीस प्रशासन व नगरपरिषद यांची वाहतुक व पार्किंग व्यवस्थेबाबत एकत्रित बैठक आयोजीत केली होती. येणारे भाविक सदरची वाहने पार्किंगच्या ठिकाणी न लावता, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्गावर वाहने लावुन दर्शनाला जात असल्याने या रस्तावर असलेल्या दुकानदारांना वाहने दुकाना समोर लावल्याने त्रास होत असल्याने संबंधीत व्यापा-यांनी नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत तसेच वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. याकरिता सहा.पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, व.पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी पंढरपूर नगरपरिषदेकडे ४० जामर देणेबाबत मागणी केली होती. त्यास अनुसरुन पंढरपूर नगरपरिषदेतर्फे आज मा.नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, उपनगराध्यक्ष सुजाता त्रिंबक बडवे यांच्या अध्यक्षतेखाली, शिक्षण समिती सभापती संजय निंबाळकर, पाणीपुरवठा समिती सभापती विक्रम शिरसट, नगरसेवक नरसिंह शिंगण, , माजी नगरसेवक सचिन डांगे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ रानगट, नगर अभियंता दिनेश शास्त्री, प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी सुनील वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक (ट्राफीक) चव्हाण साहेब यांना ४० जामर देण्यात आले.
यावेळी पोलीस विभागाचे (ट्राफीक) चव्हाण साहेब यांनी वाहतुक सुरळीत होवुन नागरीकांना तसेच भाविकांना ट्राफीकचा त्रास होणार नाही याचे आश्वासन देवुन ४० जामर दिलेबाबत पंढरपूर नगरपरिषदेचे आभार व्यक्त केले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
