रायमोहा येथे संत एकनाथ पालखी आगमनाची जय्यत तयारी


शिरूर: पैठणहून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे बुधवारी रायमोहा येथे आगमन होत आहे. पालखी स्वागताची जय्यत तयारी ग्रामस्थांकडून करण्यात आली असून गावचे वातावरण भक्तिमय झाले आहे. दार वर्षीची पारंपार कायम ठेवत संत एकनाथ महाराज यांची पालखी मुक्कामी येणार आहे. त्या अनुषंगाने कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आदी कार्यक्रम होणार असून पालखी स्वागतासाठी घरा-घरासमोर रांगोळी काढण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांच्या जेवणाची सोयही ग्रामस्थांनी केलीय आहे. पालखीच्या स्वागतासाठी परगावी असलेले ग्रामस्थ गावाकडे परतत आहेत. एकंदरीत भक्तिमय वातावरण झाले असून रायमोहा पंचायत संतीच्या गणातील नागरिकांना पालखी दर्शनाचा लाभ घेण्याचे आव्हान भाजपा विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष गोकुळ सानप व शिवसेनेचे सर्कल प्रमुख सुनील जाधव यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!






सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111