संत मुक्तार्इंची पालखी बीडमध्ये विसावली
बीड : आषाढी वारीसाठी श्री. क्षेत्र मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून पंढरीकडे प्रस्थान केलेल्या संत मुक्ताबार्इंच्या पालखीसोहळ्याचे मंगळवारी सकाळी एकादशीच्या मुहूर्तावर शहरात आगमन झाले. बीडकरांनी पालखीतील वारकऱ्यांना अल्पोपहार देतानाच पादुकांचे दर्शन घेऊन ‘मुक्ताबाई मुक्ताबाई, आदीशक्ती मुक्ताबाई’चा जयघोष केला. पालखीचा मंगळवारचा मुक्काम माळीवेस येथील हनुमान मंदिरात असून बुधवारी पेठ बीड भागातील बालाजी मंदिरात पालखी विसावणार आहे.
श्रीे. क्षेत्र मुक्ताईनगर येथून ३० मे रोजी आषाढीवारीसाठी संत मुक्तार्इंचा पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला असून यंदा या पालखी सोहळ्याचे ३०८ वे वर्षे आहे. अव्याहतपणे पंढरीकडे प्रस्थान ठेवणाऱ्या या पालखी सोळ्यात यंदा सातशे भाविकांचा सहभाग आहे. दोन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातून पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन झाले. गेवराईत मुक्काम करुन मुक्तार्इंचा पालखी सोहळा बीडमध्ये दाखल झाला. पारगाव जप्ती, पेंडगाव येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात आगमन होताच ठिकठिकाणी विविध सेवाभावी संस्था, व्यापारी यांनी पालखीतील वारकऱ्यांना अल्पोपहार देऊन त्यांची सेवा केली. सुभाष रोड व्यापारी संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांना विविध साहित्य भेट देण्यात आले. दुपारी पालखी माळीवेस येथील हनुमान मंदिरात विसावली. पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र महाराज हरणे, ज्ञानेश्वर महाराज हरणे यांच्यासह संत मुक्ताई संस्थानचे पदाधिकाऱ्यांचे हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले. मंगळवारी रात्री माळीवेस मंदिरात कीर्तन होणार असून मुक्तार्इंच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत. बुधवारी सकाळी धोंडीपुरा, टिळक रोड, जुना बाजारमार्गे पालखी पेठेतील बालाजी मंदिरात मुक्कामी पोहोचणार आहे. पालखीच्या आगमनामुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून ‘साधू -संत येति घरा, तोचि दिवाळी दसरा’ या भक्तिभावाने बीडकर पालखीतील वारकºयांच्या सेवेसाठी पुढाकार घेत आहेत.
नात घेणार आजोबांचे दर्शन
संत मुक्तार्इंचे आजोबा ब्र. गोविंदपंत कुलकर्णी यांची समाधी शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदी किनारी आहे. बालाजी मंदिरातील पंढरीकडे मार्गस्थ होताना नात मुक्ताई आजोबांच्या दर्शनाला जाणार आहेत. मागील दहा वर्षांपासून नात- आजोबांच्या भेटीचा अनुपम्य सोहळा हजारो भाविक आपल्या डोळ्यात साठवितात आणि ‘धन्य आजि दिनू सोनियाचा, अमृते पाहिला’ ही भावना नकळत साऱ्यात भाविकांत निर्माण होते. आजोबा ब्र. गोविंदपंत यांच्या समाधीस्थळी सभागृहात उभारण्यात आले असून संयोजकांकडून नात मुक्ताईला साडीचोळीचा आहेर देऊन ओटी भरली जाते. संपूर्ण राज्यात नात- आजोबांच्या भेटीचा हा अनोखा सोहळा केवळ बीडकरांना अनुभवयास येतो.
वाहने उभी करुन टेकविला माथा
पालखी गेवराईतून बीडकडे मार्गस्थ झाल्यानंतर वाटेत ठिकठिकाणी वाहने उभी करुन अनेकांनी पादुकांचे दर्शन घेतले. ‘भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले’ अशाच काहीशा भावना यावेळी भाविकांमध्ये होत्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

