भाजपा आमदाराच्या अंगरक्षकानं स्वतःवरच झाडली गोळी
गडचिरोली, दि. 23 - भाजपाचे आमदार कृष्णा गजबे यांच्या अंगरक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (23 जून ) सकाळची गजबे यांचे अंगरक्षक भास्कर चौके यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गजबे यांच्या कार्यलयाबाहेरच त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. यानंतर चौके यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भास्कर चौके यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111