कुंचल्यातून अवतरली पंढरीच्या विठ्ठलाची वारी!
बारामती : अवघा रंग एकची झाला...रंगी रंगला श्रीरंग... अवघा रंग एकची झाला आषाढी वारी म्हटलं, की लहानथोर सारेच आपल्या परीने विठ्ठलभक्ती आणि वारकरी संप्रदायावर असणारी आपली निष्ठा अधोरेखित करीत असतात. बारामती येथे पालखीमार्गावर कुंचल्यातून आषाढी वारी अवतरली आहे. येथील कलाशिक्षकांनी एकत्र येऊन आषाढी वारीचे सुंदर चित्र रेखाटले आहे. त्यामुळे पालखीमार्ग वारीमय
झाला आहे.

या चित्रात विठ्ठलाचे सावळे रूप, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज, जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्यासह टाळकरी, विणेकरी, पखवाजवादक, डोईवर तुळस घेतलेल्या वारकरी महिला, भालदार, चोपदार, निशानदार आणि पालखी खांद्यावर घेतलेले वारकरी पाहताना बारामतीकर हरखून जात आहेत. येत्या शनिवारी (दि. २४) बारामतीत संत तुकोबारायांची पालखी मुक्कमी असेल. या पार्श्वभूमीवर, हे चित्र कलाशिक्षकांनी रेखाटले असल्याने बारामतीत येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचे स्वागत पालखीमार्गावर या ‘कुंचल्यातील वारी’ने होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111