मला दयामरण द्या!; राजीव गांधींच्या मारेकऱ्याची सरकारला विनंती

राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी रॉबर्ट पायस याला १९९१ मध्ये अटक करण्यात आली होती. हत्येप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २६ वर्षांपासून तो तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. रॉबर्टला अटक झाली त्यावेळी तो अवघ्या २० वर्षांचा होता. २६ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या रॉबर्टनं आता तामिळनाडू सरकारकडं दयामरण मिळावं, अशी विनंती केली आहे. माझ्या जगण्याला काही अर्थ नाही. मला जगायचं नाही. न्याय मिळेल ही आशा संपुष्टात आली आहे. त्यामुळं मला दयामरण द्यावं, अशा विनंतीचं पत्र त्यानं तामिळनाडू सरकारला पाठवलं आहे.
गेली २६ वर्षे तुरुंगात असून सरकारचा हेतू मी समजू शकतो. गेल्या काही वर्षांपासून माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य मला भेटण्यासाठी आला नाही. तुरुंगातून सुटका होईल असं आता वाटत नाही. त्यामुळं मला दयामरण द्यावं, अशी विनंती करतो, असंही त्यानं पत्रात म्हटलं आहे. २०१४ मध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी माझ्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. पण आता माझा उर्वरित आयुष्य तुरुंगातच जावं, अशी सरकारची इच्छा आहे आणि ते मी समजू शकतो. तुरुंगातून सुटका होईल ही आशा संपली आहे. त्यामुळं मला दयामरण द्यावं आणि माझं पार्थिव माझ्या कुटुंबीयांकडे पाठवण्यात यावं, अशी विनंती त्यानं मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
...