जिल्हा बँकांकडील जुन्या नोटा आरबीआय स्वीकारणार
देशभरातील जिल्हा बँकांमध्ये असणा-या जुन्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेत भरायला केंद्राने मंजूरी दिली आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पाच दिवसांच्या कालावधीत जिल्हा बँकांना स्वत:कडे जमा झालेल्या पाचशे व हजारांच्या नोटा रिझव्र्ह बँकेकडे जमा करता येतील, असे निर्देश अर्थ मंत्रालयाने दिले आहेत. याशिवाय, बँका आणि टपाल कार्यालयानांदेखील ३० डिसेंबर, २०१६ पूर्वी जमा झालेल्या नोटा रिझव्र्ह बँकेकडून बदलून घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आधी या नोटा का जमा झाल्या नाहीत याचे स्पष्टीकरणदेखील मागितले जाणार आहे.जिल्हा बँकांकडे शेतक-यांना देण्यासाठी रोकड नसल्याची बाब समोर आल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
रिझव्र्ह बँकेने गेल्यावर्षी १४ नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून जिल्हा सहकारी बँकांना रोकड स्वीकारण्यास आणि चलनबदल करण्यास बंदी घातली होती. जिल्हा सहकारी बँकांना परवानगी दिल्यास त्या काळा पैसा पांढरा करण्याचे केंद्र बनतील अशी भीती केंद्र सरकारने व्यक्त केली होती. त्यानंतर, महाराष्ट्रात शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी राज्यातील जिल्हा बँकांकडे जमा झालेल्या २ हजार २७० कोटी रुपयांच्या नोटा रिझव्र्ह बँकेकडून बदलून मिळाव्यात ही मागणी उचलून धरली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
...