योग मानवी मनाला सशक्त करण्याचे माध्यम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 21: योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून मानवी मनाला सशक्त करण्याचे एक माध्यम आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुंबई पोलीस, स्पंदन आर्ट व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने फ्लॅग एन्ड प्रोमेनाल्ड, वांद्रे रेक्लेमेशन (पू.) या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, खासदार पुनम महाजन, आमदार ॲड.आशीष शेलार, मनपा आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त दत्त्तात्रय पडसलगीकर, कायदा व सुव्यवस्था सह पोलीस आयुक्त देवेन भारती, योग तज्ज्ञ सुनैता रेखी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, योगामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो. मनाला सशक्त करण्याचे ते एक माध्यम आहे. 176 देशातील लोक योगाला प्राधान्य देतात ही बाब गौरवास्पद आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणाले की, व्यक्ती योगाद्वारे निरोगी राहतो. योगाला सर्वांनी प्राधान्य द्यावे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111