देशातील जीआयएस प्रणाली अकलूज ग्रामपंचायतीची



अकलूज- जीआयएस प्रणालीद्वारे कर आकारणारी अकलूज ग्रामपंचायत ही देशातील पहिली ग्रामपंचायत असून गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेकडून शक्‍य तितके सहाय्य करण्यात येईल, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले.
अकलूज ग्रामपंचायतीच्या जीआयएस प्रणालीद्वारे केलेल्या करआकारणी प्रणालीचे उदघाटन खासदार विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार हनुमंत डोळस, धैर्यशील मोहिते-पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते – पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील,शितलदेवी मोहीते-पाटील, उपसभापती किशोर सुळ, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, किशोरसिंह माने-पाटील, उपसरपंच धनजंय देशमुख, पंचायत समितीच्या सदस्या ऍड. हसीना शेख, हेमलता चांडोले, गटविकास अधिकारी सुरेश मारकड आदी उपस्थित होते.
भारुड म्हणाले, ग्रामीण विकास खात्यातील टर्निंग पॉंईट म्हणून आजच्या दिवसाची नोंद होईल. जीएसआय प्रणालीमुळे ग्रामपंचायतीच्या मिळकतीत वाढ होऊन विकासकामास मदत होणार आहे. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक केले. माळशिरस तालुका हा सोलापूर जिल्ह्यात मोठा तालुका व सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका असून शासनाच्या वतीने जाचक अटी लादण्यात आलेल्या आहेत. त्या थोड्या शिथील कराव्यात व शौचालयासंदर्भात निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी सोलापूर जिल्हा परिषदेचे पक्षनेते धैर्यशिल मोहिते पाटील यांनी केली. तालुक्‍यातील विकास आराखड्याची माहिती सांगितली.
सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील म्हणाले की, गावाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवून चारी बाजुनी विकास केलेला आहे. जीआयएस प्रणालीद्वारे मालमत्ता सर्व्हेक्षण केल्याने कामकाजात पारदर्शकता येणार आहे. भविष्यात अकलुज गाव संपुर्णपणे हागदारीमुक्‍त करण्यासाठी प्रयत्न आहे. जितेंद्र शेटे म्हणाले की, उपग्रहद्वारे छायाचित्रे घेऊन मालमत्ता सर्व्हेक्षण केल्याने मालमत्तासंदर्भातील माहिती संगणकावर एका क्‍लिकमध्ये मिळणार आहे. अकलुजमधील 1600 मालमत्तेचे या प्रणालीद्वारे सर्व्हेक्षण झाले असून सुमारे दोन कोटी इतका जादा कर ग्रामपंचायतीस मिळणार आहे.

.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111