कल्याणच्या नेवाळी गावात तणाव, संरक्षण राज्यमंत्र्यांची बैठक

सुभाष भामरे सध्या धुळ्यात आहेत, ते उद्या दिल्लीत जाणार आहेत.
शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन
नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादित केल्याच्या विरोधात नाका परिसरकार शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन सुरु आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवर डावलपाडा गावाजवळ पोलिसांच्या सहा गाड्या पेटवल्या. तर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. यामध्ये एसीपी सुनील पाटील यांच्यासह काही पोलिस जखमी झाले आहे. परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.

नेवाळीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला. यामध्ये 12 आंदोलक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांच्या लष्कराने नेवाळे गावाजवळ धावपट्टीसाठी जागा घेतली होती. मात्र त्यानंतर ती जागा शेतकऱ्यांच्या ताब्यात गेली. आता पुन्हा नौदलाने जागेवर दावा सांगत कम्पाऊंड टाकल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. जवळपास 7 ते 8 गावातील शेतकऱ्यांच्या जमीन यामुळे बाधित होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
...