स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या बाह्यरुग्ण विभाग, सिटी स्कॅनचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन




 नागपूर, दि. 25 :  स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या बाह्यरुग्ण विभागाच्या नवीन इमारतीचे तसेच सिटी स्कॅनचे  उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री मिलींद माने, आशिष देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे तसेच स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, मिशनचे सदस्य उल्हास गुजवणे, डॉ. प्रशांत ओंकार, नरेंद्र सातफळे, मनोहर वैद्य, खापरी ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती पार्वती आत्राम तसेच हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या बाह्यरुग्ण विभागाच्या नवीन इमारतीचे तसेच सिटी स्कॅन संयंत्राचे फीत कापून उद्घाटन केले. यावेळी त्यांनी संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी करुन येथील रुग्णांची चौकशी केली. गोरगरिबांना हॉस्पिटलच्या वतीने देण्यात येणाऱ्या वैद्यकीय  सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त करुन  मिशनच्या पुढील कार्यासाठी  शुभेच्छा दिल्या.
स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्यावतीने गेल्या 40 वर्षांपासून गोरगरिबांना अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधा अत्यल्प दरामध्ये उपलब्ध करुन दिल्या जात आहे. येथे रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी योजनेचाही लाभ दिला जातो. सन 1974 मध्ये तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी स्वत:च्या मालकीची जमीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला  दान दिली. या जागेवरच स्वामी विवेकानंद मिशनची इमारत उभी आहे. या हॉस्पिटलमध्ये आजूबाजूच्या सुमारे शंभर खेडयापाडयातील रुग्ण उपचारासाठी येतात. नागपूर शहरातील नामाकिंत डॉक्टर येथे आपली सेवा देतात. येथे अपघात आणि आपात्कालीन सेवा तसेच अतिदक्षता विभाग, कृत्रिम श्वसन यंत्रणा, चोवीस तास डॉक्टर आणि ॲम्बुलन्स सेवा, एक्स-रे, फिजियोथेरेपीचे सुसज्ज युनिट,गुडघा प्रत्यारोपण केंद्र इत्यादी महत्वपूर्ण सुविधा रुग्णांना उपलब्ध करुन दिल्या जातात. येथे स्त्री रोग व प्रसुती विभाग, नेत्र चिकित्सा, सर्जरी, बाल रोग, मेडिसिन इत्यादी विभाग कार्यरत आहेत.
 स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्यावतीने कोराडी येथे देखील हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली आहे. येथे  बाह्यरुग्णांसाठी ओपीडी तसेच छोटया आजारावर शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111