विकासकामांमधून नागपूरचा चेहरा बदलविणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 ·         60 कोटी रुपयांच्या खापरी येथील उड्डाणपुलाचे भूमिपूजन

·         शेतकऱ्यांना सर्वांत मोठी कर्जमाफी देऊन सक्षम बनविणार






नागपूर, दि.25 :  नागपूर आणि शहराच्या भागात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. सुमारे 65 हजार कोटींची कामे या अंतर्गत होणार असून नागरीकांना सुविधा निर्माण झाल्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने 60 कोटी रुपये खर्चून खापरी येथील रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या कोनशिलेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, डॉ. मिलींद माने, आशिष देशमुख, मल्लिकार्जून रेड्डी, सुधीर पारवे, समीर मेघे, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नागरीकांच्या सुविधांसाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. खापरी उड्डाणपूल हा अतिशय रुंद असल्यामुळे याठिकाणी वाहतुकीचा खोळंबा आणि अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे 60 कोटी रुपये खर्चाचा सुमारे एक किलोमीटरचा पूल बांधण्यात येत आहे. याचा फायदा दक्षिण नागपूरातील नागरीकांना होणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे ट्विनस्टार या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कंपनीने नागपूरात 16 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. नागपूर परिसरातील ही सर्वात मोठी गुंतवणूक असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. गेल्या तीन वर्षात देशात 22 हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात समृद्धी महामार्ग आणि रस्त्यांचे जाळे निर्माण होण्यास मदत होणार आहे.
राज्य शासनाने केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांना नव्याने उभे राहण्यासाठी मदतगार ठरणार आहे. कर्जमाफी महत्वाचीच आहे पण त्यासोबतच शेतीतील गुंतवणूक ही त्यापेक्षाही महत्वाची आहे. कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय शोधण्यात येतील. यामुळे भविष्यात शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. कर्जमाफी हा अंतिम पर्याय नाही. मात्र शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी ही कर्जमाफी देण्यात आली आहे. येत्या काळातही शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळीमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नागपूर परिसरात सुमारे 65 हजार कोटींची कामे करण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. ही कामे चांगल्या पद्धतीने होण्यासाठी चांगले डिजाईन करण्यावर भर देण्यात आला आहे. खापरी येथील उड्डाणपूल लवकरात लवकर तयार होणार असून लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येईल. खापरी येथील नव्या रेल्वे उड्डाणपुलामुळे येथील वाहतूक कोंडी सुटण्याबरोबरच अपघात विरहित वाहतूक होण्यास मदत मिळणार असल्याचे यावेळी सांगितले.
 पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिहान प्रकल्पामुळे नागपूरकरांच्या विकासात भर पडली आहे. उड्डाणपुलामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते खापरी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सदस्य डी. ओ. तावडे यांनी प्रकल्पाची माहिती देऊन मान्यवरांचे स्वागत केले. प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी एम. चंद्रशेखर यांनी आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!




सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111