स्वातंत्र्यादिनी शेतकऱ्यांच्या मुलांचे आत्मक्लेश आंदोलन स्वातंत्र्यासाठी शेतकऱ्यांची मुलं करणार एक दिवसीय उपोषण
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – शेतकऱ्यांना गळफास ठरणारे धोरण आणि कायदे यांच्यापासून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळावे, ही मागणी घेऊन राज्यभरातील शेतकऱ्यांच्या संघटना आणि शेतकऱ्यांची मुल-मुली पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनी एक दिवसाच्या लक्षणिक उपोषणावर बसणार आहेत. साऱ्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या वेदनांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांची मुलं उपाशी राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात स्वातंत्र्याच्या ६९ वर्षानंतर पहाट उगवली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची मुल मैदानात उतरत आहेत. १५ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आत्मक्लेश आंदोलन करण्याचे भूमीपूत्र संघर्ष वाहिनीने ठरवले आहे, असे या संघर्ष वाहिनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित फाळके आणि किसानपुत्र संघटनेचे समन्वयक अमर हबीब यांनी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आजवर सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कमाल जमीनधारणा (सिलिंग) कायदा, अत्यावश्यक वस्तू कायदा अाणि भूमी अधिग्रहण कायदा हे तीन कायदे शेतकऱ्यांसाठी गळफास ठरले आहेत. देशातील विविध कायद्यांचा फेरविचार करून ते रद्द करण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी केलेल्या पहिल्या भाषणात दिली होती. मात्र कालबाह्य ठरलेले कायदे रद्द करणारे सरकार शेतकऱ्यांच्या मरणाला कारणीभूत ठरणारे कायदे रद्द करीत नाही, अशी टीका शेतकरी चळवळीचे अभ्यासक अमर हबीब यांनी केली.
# भगवे इंग्रज आले...
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हतबलतेला वाट मोकळी करून देण्यासाठी शहरात येवून स्थिरावलेल्या शेतकरी पुत्रांनी हा निर्णय घेतला असून स्वातंत्र्याच्या दिवशीच व्यवस्थेला जाग यावे म्हणून आत्मक्लेश करणार असल्याचे अमर हबीब यांनी सांगितले. " सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होत नाही. आधी गोरे इंग्रज होते मग काळे इंग्रज अाले. आता भगवे इंग्रज आले आहेत. तरीही शेतकऱ्यांची स्थिती बदलत नाही. इंग्रजांच्या शेतकऱ्यांच्या लुटीचे धोरण राबवित आहे,'' अशी टीका अमर हबीब यांनी केली. खंत ही यावेळी बोलताना हबीब यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील शेतकरी आता पिचला आहे, तो आवाज बुलंद करु शकत नाही. त्यामुळे शहरांमध्ये राहणारी आणि दुसऱ्या व्यवसायात गेलेली शेतकऱ्यांच्या मुलांनी पॅंथर्सच्या धर्तीवर आंदोलनाला पुढे यावे असे आवाहन अमर हबीब यांनी यावेळी केले. राज्यात दलितांवर अत्याचार वाढल्यावर जशी मुंबईत दलित तरूणांनी पॅंथर्ससारखी चळवळ उभारली तशीच चळवळ आता शेतकऱ्यांच्या मुंबई-पुणे सारख्या शहरात राहणाऱ्या मुलांनी आता शेतकऱ्यांसाठी चळवळ उभारली आहे. मागच्या कालखंडातील सरकारे आणि सध्याचे सरकार देखील शेतकऱ्यांशी क्रुरपणे वागत आहे असे ते म्हणाले. १५ ऑगस्ट पासून सुरु होणारे हे आंदोलन तहयात सुरु राहणार असून, पुढील २ ऑक्टोबर रोजीही पुण्यामध्ये भुमिपुत्रांचा मोठा मेळावा आयोजित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत फाळके यांनी शहरातील भूमिपुत्रांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी एक दबाबगट बनवून आपल्या बांधवाना सरकारी जाचक कायद्यातून बंधमुक्त करायला हवे. भूमीपुत्र संघर्ष वाहिनीच्या माध्यमातून २९ शेतकऱ्यांचे घरी जाऊन २९ लाख रूपयांचे कर्जमुक्त करण्याचे काम ही केले असल्याचे फाळके यांनी नमूद केले. या आंदोलनाला भूमीपुत्र शेतकरी संघटना जळगाव, किसानपुत्र आंदोलन, शेतकरी आधार फाऊंडेशन यवतमाळ, जनमंच नागपूर, किसान अधिकार अभियान वर्धा, अन्नदाता शेतकरी संघटना महाराष्ट्र, युवा शेतकरी संघर्ष समिती नेर यवतमाळ, अखिल मानवाधिकार संघटना, वर्धा जिल्हा सरपंच संघटना, प्रहार संघटना महाराष्ट्र, बळीराजा चेतना परिषद, युवा शेतकरी संघटना कोल्हापूर सीमाभाग बेळगाव, क्रांतिकारी भगत सिंग संघटना वर्धा, पोलिस सेवादल यवतमाळ, दुर्वा जास्वंद शेतकरी महिला स्वयंरोजगार गट, दर्यापूर अमरावती, अमरावती जिल्हा सोयाबीन उत्पादक संघ, कमल फाउंडेशन नांदेड, शेतकरी बांधव महाराष्ट्र, सह्याद्री युथ फाउंडेशन महाराष्ट्र, शिवराय विद्यार्थी संघटना वर्धा, ऊस उत्पादक संघटना अकोला, लढा संघटना अमरावती, शेर शिवाजी संघटना, फोरम ऑफ इंटेल्कूच्युअल्स, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ, शंभूसेना संघटना महाराष्ट्र या २७ संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.
चौकट :-
१) " देश शेतीप्रधान असल्याचे राजकीय नेते उच्चरवात सांगतात. मात्र देशभरात आजवर लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असतानाही विधानसभेमध्ये किंवा लोकसभेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आजवर श्रध्दांजली अर्पण करण्याची सद् बुध्दी झाली नाही, " असेही हबीब यांनी सांगितले.
२) शेतकरी व्याख्येचा चुकीचा अर्थ :- अमर हबीब, समन्वयक, किसानपुत्र आंदोलन
" आजकाल प्रत्येक जण शेतकरी असल्याचे सांगतो. कायद्याने ज्याची उपजिविका शेतीवर अवलंबून आहे, तोच शेतकरी आहे. केवळ सात बारावर नाव आहे म्हणून कुणी शेतकरी होत नाही, " असे त्यांनी सांगितले.

संलग्नके क्षेत्र