आता एलपीजी गॅस सिलेंडरचे पैसेही ऑनलाईन भरा
आता एलपीजी गॅस सिलेंडरचे पैसेही ऑनलाईन भरा
नवी दिल्ली: एलपीजी गॅस ग्राहकांच्या वेळेची बचत आणि व्यवहाराची चोख नोंद ठेवण्याच्या दृष्टीने केंद्रींय पेट्रोलियम मंत्रालयानं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे पैसेही आता ऑनलाईन भरता येणार आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी याबाबत घोषणा केली.ग्राहकांना सोईस्कर, व्यवहारात पारदर्शकता आणि रोख रकमेविना व्यवहार या हेतूने केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने पैसे भरण्यासाठी ऑनलाईन सेवा सुरु केली आहे.
आतापर्यंत केवळ इंडियन ऑईल,हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या ऑईल मार्केटिंग कंपनींच्या ऑनलाईन बुकिंग सुविधा होत्या. मात्र, या कंपन्यांचींही केवळ बुकिंग ऑनलाई होती, पैसे प्रत्यक्षरित्या डिलिव्हरी करणाऱ्याकडे किंवा वेन्डर्सकडे जमा करावे लागत असत आणि तेही रोख रकमेच्या स्वरुपात.