शरद जोशींचा मरणोत्तर पद्म पुरस्कार कुटुंबीयांनी नाकारला

शरद जोशींचा मरणोत्तर पद्म पुरस्कार कुटुंबीयांनी नाकारला

पुणे : एकीकडे महाराष्ट्र आणि देशभरातील दिग्गजांचा पद्म पुरस्कारांनी सन्मान होत असताना तिकडं शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या कुटुंबीयानं मात्र मरणोत्तर पद्म पुरस्कार नाकारला आहे.
शरद जोशी जिवंत असताना त्यांच्या नावाचा विचार का झाला नाही? असा सवाल करुन जोशींच्या कन्या श्रेया शहाणेंनी यूपीए आणि भाजप सरकारच्या भूमिकेबद्दल खंत व्यक्त केली. तसंच पुरस्कारानं जोशी सरांच्या कामाचं मूल्यमापन होणार नाही, असंही श्रेया शहाणेंनी म्हटलं आहे.
शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांना आपल्या हक्काची जाणीव करुन दिली. त्यांना लढायला शिकवलं. शेतीचं अर्थकारण समजावून सांगितलं.
त्यांच्या कामाची दखल घेत केंद्रानं शरद जोशींना मरणोत्तर पद्म देण्याची तयारी दर्शवली होती.