संघर्षाच्या काळात माझेही शारिरीक शोषण झाले ......बॉलिवूडचा काळा चेहरा, कंगनाने केला उघड

पत्रकार बरखा दत्त यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अभिनेत्री कंगना राणावत हीने पुन्हा एकदा बॉलिवूडमधील स्त्री शोषणाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. 

मुंबई- पत्रकार बरखा दत्त यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अभिनेत्री कंगना राणावत हीने पुन्हा एकदा बॉलिवूडमधील स्त्री शोषणाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.
पत्रकार बरखा दत्त यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कंगना हिने संघर्षाच्या काळात माझेही शारिरीक शोषण झाले असा खळबळजनक गौप्यस्फोट केला. अभिनयाच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळातील काही कटु आठवणींना उजाळा देत कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूडमधील स्त्री शोषणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
तीने स्वतःच्या आयुष्यातील एका घटनेचे दाखले देत सांगितले की, ज्यावेळी ती १७ वर्षाची होती त्यावेळी बॉलिवूड मधील सेलिब्रिटींना ती देव मानत असे. मात्र या इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच तिला अनेक कटू अनुभव आले. एक व्यक्ती माझ्या वडीलांच्या वयाचा माणुस होता. मी शोषणास विरोध केला असता त्याने मला चक्क मारले होते. त्यावेळी माझ्या डोक्यातून रक्त येत होते.
मला राग आल्याने मी सुद्धा संतापाच्या भरात सँन्डल काढली आणि त्या माणसाच्या डोक्यात मारली. त्य़ामुळे त्याच्याही डोक्यातून रक्त यायला लागले. पुढे ती सांगते की, त्या व्यक्तीच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करुनही याप्रकरणी कोणतीही दखल घेण्यात आली नाही. ती व्यक्ती इंडस्ट्रीतीलच असल्याचे तीने सांगितले. परंतू त्याचे नाव सांगण्यास तीने नकार दिला.
इंडस्ट्रीतील लोक आपल्या पाठीशी उभे राहतील असे वाटले होते, मात्र माझी अपेक्षा चुकीची होती. त्यावेळी मला फार त्रास व्हायचा. मी कुठेतरी अडकले आहे, यातून बाहेर पडणार नाही असे वाटायचे, असे सांगत कंगनाने आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.