विदर्भात गारपीट, मध्य महाराष्ट्र-कोकणात पावसाचा इशारा
पुणे : येत्या सोमवारपर्यंत विदर्भात पुन्हा एकदा गारपीट होऊ शकते, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. त्यासोबत मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पाऊस पडेल असं हवामान खात्याचं म्हणणं आहे.
अमरावतीतही आज ऐन थंडीत हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे पारा आणखीन खाली गेल्यानं वातावरण चांगलचं थंड झालं होतं.
विदर्भासोबतच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधल्या काही भागात पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.