टीईटीचा पेपर फुटणं म्हणजे शिक्षण खात्याने विश्वासार्हता गमावण्यासारखं: तावडे



टीईटी पेपरफुटीची 48 तासांत चौकशी करुन गुन्हे दाखल करणार: तावडे

नागपूर शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फुटणे म्हणजे शिक्षण विभागाने विश्वासार्हता गमावण्यासारखे आहे, असे म्हणत शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी 48 तासांच्या आत चौकशी करण्याचे प्रधान सचिवांना आदेश दिले आहेत. आज बीड आणि पुणेसह अनेक ठिकाणी या टीईटी परीक्षेचे पेपर फुटले आहेत.

टीईटीचा पेपर फुटणं म्हणजे शिक्षण खात्याने विश्वासार्हता गमावण्यासारखं: तावडे
ज्या ठिकाणी पेपर फुटल्याचे प्रकार समोर आले आहेत, अशा ठिकाणी परीक्षा रद्द केली जाणार असून प्रधान सचिवांना 48 तासांच्या आत या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

या पेपरफुटी मागे कितीही मोठा अधिकारी का असला, तरीही त्याच्याविरोधात नुसती कारवाईच होणार नाही, तर फौजदारी गुन्हाही दाखल केला जाईल असे, विनोद तावडे म्हणाले.

बीडमध्ये टीईटीचा पेपर फुटला!

डीएड आणि बीएडसाठी पात्रता परीक्षा असलेल्या टीईटीचा पेपर बीडमध्ये फुटला. आज सकाळी साडेदहा वाजता परीक्षार्थी परीक्षा केंद्रात पोहचणे बंधनकारक होते. प्रत्यक्ष पेपर अकरा वाजता सुरु होणार होते. मात्र सकाळी साडे नऊ वाजताच डी एड टीईटीचा पेपर व्हॉट्सअपवरुन फिरत होता. सकाळी दहा वाजताच हा पेपर परीक्षा यंत्रणाच्या हाती पडला तरी सुद्धा कोणत्याही कारवाईविना हा पेपर चालू राहिला. एकट्या बीड जिल्ह्यात 16 हजार परीक्षार्थी ही परीक्षा देत आहेत.