कच्छमध्ये आढळले डायनॉसॉरचे जीवाश्म, १६ अब्ज वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज

  • अहमदाबाद, दि. २१ - जर्मन व भारतीय पुरातत्ववेत्यांचा समावेश असलेल्या गटाला गुजरातमध्ये कच्छ येथे डायनॉसॉरचे जीवाश्म आढळले आहेत. कच्छ शहरजावळच्या कास या टेकड्यांमध्ये हे पुरावे सापडले असून ते १६ अब्ज वर्षांपूर्वीच्या डायनॉसॉरचे असल्याचे सांगण्यात आले आहे. गेली २५ वर्षे हे संशोधन सुरू असून सुमारे १५० भौगोलिक क्षेत्रांमध्ये हे संशोधन करण्यात येत आहे.
    सुमारे १५ वर्षांपूर्वी ओएनजीसीला काही जीवाश्म सापडले होते, जे डायनॉर्सच्या समुद्रालगतच्या वास्तव्याचे दाखले होते. मात्र, अशाप्रकारे दूरच्या भागात कधी नव्हे ते आता आढळल्याचे पुरातत्ववेत्ते डी. के.  पांडे यांनी सांगितले.
    आत्तापर्यंतचे सगळ्यात प्रचंड डायनॉसॉरचे जीवाश्म अर्जेंटिनामध्ये २०१४मध्ये सापडले होते.