पंढरपूर नगरपरिषदेच्या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव द्यावे... पंढरपूर अ.भा. छावा युवा संघठनेची मागणी

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-दि.18 जानेवारी 2016

पंढरपूर नगरपरिषदेच्या इमारतीमधील  सभागृहाला अद्याप कुठल्या ही नावा ने संबोधले जात नाही, तरी या सभागृहाला छञपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे. या आशयाचे निवेदन आज येथील अखिल भारतीय छावा युवक संघटन च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंढरपूर न.प. चे प्रभारी मुख्याधिकारी श्री.पाटील यांना  दिले आहे.

या निवेदनात पुढे उल्लेख केला आहे की, महाराष्ट्राचे आराध्ये दैवत छञपती शिवाजी महाराज यांचे नाव जर पंढरपुर नगरपालीकेतल्या सभागृहाला दिले तर सभागृहाची एक प्रकारे ओळख निर्माण होईल. अशा पराक्रमी शूर राजाच्या छत्रछाये खाली सभा होत आहे. याचे भान ठेवुन सर्वजण या सभागृहाचा मान ठेवतील. तरी प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी.

यावेळी अ.भा.छावा चे पंढरपूर शहराध्यक्ष सागर कदम, शहरसंघटक सागर चव्हाण, शहर सचीव गणेश थिंटे, सोपान काका देशमुख, संतोष खिलारे, रवी माळी, अमर खपाले, नागेश लोखंडे व इतर कार्यकर्तेे उपस्थीत होते.