अबब! अवघ्या 62 लोकांच्याकडे एकवटलीय जगातील 50 टक्के संपत्ती
दि. 18 जानेवारी 2016
लंडन - जगातील 50 टक्के लोकांकडे जेवढी संपत्ती आहे, तेवढीच संपत्ती अवघ्या 62 सर्वाधिक श्रीमंतांकडे एकवटलेली आहे, असा निष्कर्ष एका अहवालानुसार समोर आला आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणार्या वार्षिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेली ही आकडेवारी धक्कादायक आहे. ऑक्सफाम संस्थेच्या अहवालानुसार, 2010 सालापासून जगातील 62 सर्वाधिक श्रीमंतांची संपत्ती 44 टक्क्यांनी वाढली आहे. तर, 3.5 अब्ज गरीब नागरिकांची संपत्ती 41 टक्क्यांनी घटली आहे. सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी जवळपास 50 टक्के व्यक्ती या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. तसेच युरोप, चीन, ब्राझील, मेक्सिको, जपान व सौदी अरेबियात ऊर्वरित श्रीमंत व्यक्ती वास्तव्यास आहेत.
जगातील 7.6 लाख कोटी डॉलर लोकांची संपत्ती टॅक्स हॅवन्समध्ये आहे. प्रत्येकाने योग्य कर भरला. तर सर्व देशातील शासनांकडे दरवर्षी सुमारे 190 अब्ज डॉलरचा निधी उपलब्ध होईल. ही रक्कम जगभरातील अनेक गरीब मुलांचे आरोग्य सुधारण्यास उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक गॅब्रियल झुकमन यांनी केले.
जगातील सर्वात गरीब लोक गरीब राष्ट्रांमधून राहत नसून, ते विकसनशील राष्ट्रांमधील आहेत अशी माहिती आर्थिक सहकार आणि विकास संघटनेच्या(ओईसीडी) अहवालानुसार समोर आली आहे.