धावत्या रेल्वेच्या टॉयलेटमध्ये आजीचा पाय अडकला

रत्नागिरी : कोकणकन्या एक्सप्रेसच्या टॉयलेट होलमध्ये पाय गेल्यानं एक आजी गेल्या 11 तासांपासून रेल्वेच्या डब्यात अडकून पडल्या. त्या होलमधून पाय काढण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी अथक परिश्रम करत होते. तब्बल साडे अकरा तासाच्या अथक परिश्रमानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं.
कटरने टॉयलेट कापून आजीला बाहेर काढण्यात आलं.



यासाठी हा डबा गाडीपासून वेगळा करण्यात आला आहे. मात्र टॉयलेट होल आणि पायचं माप सारखंच असल्यानं पाय काढण्यात अडचणी येत होत्या

या आजींची सुटका करण्यासाठी टॉयलेट कापावं लागलं. ज्यात आजींच्या पायाला इजा होऊ शकत होती. मात्र याशिवाय पर्याय नसल्याचं रेल्वे कर्मचाऱ्यांचं म्हणणं सांगितलं होतं.


काल रात्री मुंबईतून कोकणकन्या एक्स्प्रेस कोकणच्या दिशेने रवाना झाली. या रेल्वेने आजीबाई प्रवास करत होत्या. त्या पनवेलच्या पुढे बोगीतील टॉयलेटमध्ये गेल्या. मात्र तिथे रेल्वेची गती आणि पाय घसरल्यामुळे त्या पडल्या. त्यांचा पाय थेट मांडीपर्यंत टॉयलेटच्या होलमध्ये अडकला. रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

धक्कादायक म्हणजे या अवस्थेतही रेल्वे मार्गस्थ होतच राहिली. हा प्रकार बऱ्याच वेळाने आजीसोबत प्रवास करणाऱ्या त्यांच्या पतीच्या लक्षात आला. मग त्यांनी तातडीने रेल्वेप्रशासनाकडे धाव घेऊन मदतीची याचना केली. मात्र आजीला तातडीने त्या होलमधून बाहेर काढता येईल, अशी कोणतीही यंत्रणा नाही.

हे सर्व प्रयत्न सुरू होते तोपर्यंत रत्नागिरी स्टेशन आलं होतं. आजीबाईंना आहे त्याच स्थितीत प्रवास करावा लागला. इथे रेल्वे प्रशासनाने संबंधित बोगी थांबवून उर्वरीत ट्रेन मार्गस्थ केली. मात्र तोपर्यंत नऊ तास उलटून गेले होते.

धक्कादायक म्हणजे होलमधून आलेला पाय बाहेरूनही दिसत होता. यानंतर रेल्वे प्रशासनाने आजीचा पाय बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अखेर साडेअकरा तासानंतर त्यांना यश आलं.