धनगर व धनगडबाबत टाटा समाज विज्ञान संस्थेमार्फत संशोधन- विष्णू सवरा
विधानपरिषद इतर कामकाज :
तीन टप्प्यात होणार सर्वेक्षण व संशोधन
नागपूर : महाराष्ट्रातील ‘धनगर व धनगड हे एक आहेत किंवा कसे’ यासाठी मुंबईतील टाटा समाज विज्ञान संस्था (TISS) या स्वायत्त संस्थेमार्फत सर्वेक्षण व संशोधन सुरु असून हे संशोधन तीन टप्प्यात करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.
निवेदनात श्री. सवरा म्हणाले, पहिल्या टप्प्यात प्रारंभिक संशोधनामध्ये (Formative Research ) उपलब्ध असलेले साहित्य (Literature) याद्वारे धनगर व धनगड याचे विश्लेषण करुन वस्तुनिष्ठ संशोधनाच्या अभ्यासाचा प्रारुप आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. धनगर व धनगड हे एक आहेत किंवा कसे याबाबत संशोधन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील संशोधनास सुरुवात झाली आहे. अभ्यासासाठी दहा ते बारा आठवड्याचा कालावधी लागणार आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये गुणवत्ता अभ्यासामध्ये (Qualitative Study) शासन, विविध संस्था आदिवासी संशोधन संस्थांमधील विद्यापीठे इत्यादीकडून प्राथमिक किंवा दुय्यम माहिती गोळा करुन त्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. या आधारे धनगर व धनगड यामध्ये साम्यता अथवा फरक आहे हे निश्चित करण्यात येईल. तसेच मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिसा आणि बिहार या राज्यांमध्ये संशोधन पथक पाठवून ओरॉन व धनगड या जमातीमध्ये जीवनमान, राहणीमान, रुढी-परंपरा, संस्कृती तसेच सामाजिक व्यवहार यांचा अभ्यास करुन त्यामध्ये साम्यता अथवा फरक आहे किंवा कसे ही बाब निश्चित करण्यात येईल, असे श्री. सवरा यांनी निवेदनाद्वारे सांगितले.
तिसऱ्या टप्प्यामध्ये मुख्य अभ्यासामध्ये (Main Study) राज्यातील एकूण 36 जिल्ह्यातील धनगर समाजाच्या घरांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन नमुना सर्वेक्षण करण्यात येईल. या नमुना सर्वेक्षणामध्ये प्रमुख संशोधनाअंतर्गत धनगर जमातीची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती, त्यांचे धार्मिक व सांस्कृतिक आचरण आणि राजकीय स्थिती यांचा समावेश असणार आहे.
संशोधनाच्या तीनही टप्प्यांकरिता एकंदरीत 12 ते 15 महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यांचा अंतिम अहवाल आल्यानंतर त्या अहवालावर विचार करुन पुढील कारवाई करण्यात येईल, असेही श्री. सवरा यांनी सांगितले