देशभरात ख्रिसमसची धूम
नाताळ निमित्त देशभरात येशू जन्माचा उत्साह साजरा होत असून ख्रिश्चन धर्मीयांनी चर्चमध्ये प्रार्थना केली आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
मुंबई- नाताळ निमित्त देशभरात येशू जन्माचा उत्साह साजरा होत आहे. ख्रिश्चन धर्मीय चर्चमध्ये प्रार्थनेसाठी एकत्र आले आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या. विविध चर्चमध्ये सजवलेल्या ख्रिसमस ट्रीमुळे सणाची शोभा अधिकच वाढत आहे.
गुरूवार रात्रीपासूनच मुंबईमधील चर्चमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे.
रात्री येशूच्या आगमनाची प्रार्थना करण्यात आली. मुंबईतील माऊंट मेरी चर्च तसेच माहिममध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधवांची गर्दी पहायला मिळते. रात्री १२ नंतर येशुचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
ख्रिस्ती बांधव नवीन कपडे परिधान करीत पुष्पगुच्छ, मेणबत्ती, केक बरोबर घेवून रात्री प्रार्थनेसाठी चर्चमध्ये आले होते. रात्री दहानंतर चर्चमध्ये कॅरॉल्सच्या गायनाने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रार्थना व संदेश ऐकून शुभेच्छापत्रांची देवाण-घेवाण करीत शुभेच्छा देण्यात आल्या.
शहरातील अनेक ठिकाणी चर्चमध्ये प्रार्थना घेतल्यानंतर सॅन्टाक्लॉजने बच्चे कंपनीसह उपस्थितांना भेटवस्तू दिल्या. एकमेकांना शुभेच्छा देत आणि मध्यरात्री नंतर चर्च परिसरात आणि आकाशात नयनरम्य आतषबाजी करण्यात आली. नाताळनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.