रिपाइंच्या वतीने अंध मुलांना मिष्ठान्न वाटप

पंढरपूर येथील अंधशाळेतील मुलांना अन्न वाटप करताना रिपाइंचे जिल्हा सचिव जितेंद्र बनसोडे, शहराध्यक्ष संतोष पवार, तालुकाध्यक्ष अर्जुन मागाडे, युवक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कसबे, लक्ष्मण रणधिरे. पंढरपूर : रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांच्या सन्मानार्थ पंढरपूर येथील प्रभा-हीरा प्रतिष्ठान संचलित विशेष बालकांचे संगोपन करणार्‍या पालवीतील विद्यार्थांना रिपाइंच्या वतीने मिष्टान्न वाटप करण्यात आले.

लायन्स क्लब पंढरपूर यांची अंध विकास संचलित निवासी अंधशाळेतील मुलांना मिष्ठान्न वाटप करण्यात आले. याप्रसंगी रिपाइंचे जिल्हा सचिव जितेंद्र बनसोडे यांनी खा. रामदास आठवले हे लहानपणापासून कशा पद्धतीने दलित समाजाच्या भल्यासाठी काम करतात याची माहिती व विद्यार्थ्यांसह रिपाइंच्या कार्यकर्त्यांना दिली.
यावेळी रिपाइंचे शहराध्यक्ष संतोष पवार, तालुकाध्यक्ष अर्जुन मागाडे, युवक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कसबे, लक्ष्मण रणधिरे, संजय शिवशरण, समाधान लोखंडे, सुधाकर बंदपट्टे, संदिप कसबे, बाळासाहेब लोकरे, संदिप कसबे, विक्रम पवार, भीमराव नवगिरे, विकी कसबे, महेंद्र बनसोडे, रमेश आठवले, सुमिन बनसोडे, नीलेश कांबळे, सचिन गाडे, नीलेश जगताप, हरिष इंगळे, अविनाश काटे, नागेश चांदेकर, अमोल रिकीबे, उपस्थित होते.