श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलच्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन
पंढरपूर लाईव्ह वृत्त
डॉ.बी.पी.रोेंगे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलच्या कार्यालयाचे आज
थाटात उद्घाटन झाले. स्टेशन रोडवरील गंगा ज्वेलर्सजवळ असणार्या या कार्यालयाचे उद्घाटन विद्यमान संचालक राजाराम आण्णा सावंत यांच्याहस्ते झाले. श्री विठ्ठलाबरोबर कर्मवीर कै.औदुंबरआण्णा पाटील व सहकार शिरोमणी कै.वसंतराव काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी हणमंत पवार, अनिल बोराडे, सरदार घाडगे, काशीनाथ लवटे, राजश्री पंडीत भोसले, विशाल भोसले, नाना खांडेकर, कोकाटे, औदुंबर निकम, बंटी वाघ, बाळासाहेब पाटील, संभाजी शिंदे, सर्जेराव शेळके, प्रमोद भोसले, शिवाजी चव्हाण, अशोक पाटील, पंजाबराव भोसले यांच्यासह सभासद, माजी संचालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
