गार्डी गावातील भव्य मंदिरात मारूती मुर्तीची प्राणप्रतिष्ठा

पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट्र लाईव्ह न्युज
गार्डी , ता पंढरपुर (गुरूराज इनामदार यांजकडून)
गार्डी , ता पंढरपुर येथे नविन बांधण्यात आलेल्या भव्य मारुती मंदिरामधे मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
नेहमीच आध्यात्मिक वारसा जपणाऱ्या या  गावातील ग्रामस्थांनी मारुती मुर्तीची टाळ मृदुंगच्या गजरात भव्य मिरवणूक काढली यामधे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि विद्यामंदिर हायस्कूल गार्डी च्या विद्यार्थी, चिमुकल्यांनी तर हा आनंद द्विगुणित केला.
या मिरावणुकीच्या नंतर दिवसभर होमहवन मंत्रोउच्चाराने गावातील वातावरण भक्तिमय झाले होते.
मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर सायंकाळी हरीभजनाचे देखील आयोजन केले होते.
गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीमधून अतिशय मनमोहक असे मंदिर बांधले आहे. गार्डी या गावामधे आजपर्यंत 14 वेळा रामायणाचे परायण अत्यंत उत्साहाने पार पडले. याचमुळे या गावाची पंचक्रोशित ओळख आहे.
यापुढेही याच भावनेने भगवंताची सेवा करण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली.