विठ्ठल साखर कारखाना निवडणुकीसाठी आज 7 उमेदवारी अर्ज दाखल
पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि. 18 डिसेंबर 2015
श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणूनगर, गुरसाळे, ता. पंढरपूर या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज एकुण 7 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
भंडीशेगाव, ता. पंढरपूर येथील गिड्डे मधुकर शामराव यांचा 1 अर्ज, पंढरपूर येथील माने जयवंत मोहनराव यांचे 2 अर्ज, भंडीशेगाव, ता. पंढरपूर येथील नाईकनवरे सत्यवान महादेव यांचा 1 अर्ज, गादेगाव, ता.पंढरपूर येथील फाटे नागनाथ एकनाथ यांचा 1 अर्ज, सुपली, ता. पंढरपूर येथील यलमर मारुती विष्णु यांचा 1 अर्ज तर धोंडेवाडी ता. पंढरपूर येथील देठे विलास विष्णु यांचा 1 अर्ज असे एकुण 7 अर्ज आज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल झाले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी पंढरपूर यांनी दिली आहे.