श्री विठ्ठल परिवार एकसंघपणे राहणार - कल्याणराव काळे
पंढरपूर (प्रतिनिधी) श्री विठ्ठल साखर कारखाना हा तालुक्याच्या विकासाचे केंद्र बिंदू आहे. यामाध्यमातून तालुक्यताील शेतकर्यांचा सवार्र्ंगिण विकास झाला आहे. परिवारातील शेतकर्यांना आता कुठे चांगले दिवस बघायला मिळू लागले आहेत. शेतकर्यांची संस्था बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती, परंतु काही राजकीय विघ्नसंतोषी लोकांनी श्री विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीचा घाट घातला आहे. तरीही सभासद शेतकरी अशा लोकांना थारा देणार नाहीत. यापुढच्या निवडणुकांना देखील विठ्ठल परिवार एकसंघपणे सामोरे जाईल असे प्रतिपादन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री कल्याणराव काळे यांनी केले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकी निमित्त श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या वतीने सुस्ते, ता.पंढरपूर येथे जाहिर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रचार सभेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन तथा आमदार भारतनाना भालके हे होते. याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री लक्ष्मणआबा पवार, श्री विठ्ठल सूत गिरणीचे चेअरमन श्री दिनकर पाटील, संचालक सर्वश्री राजुबापू पाटील, रायाप्पा हळणवर, माधव चव्हाण, रामदास चव्हाण तसेच रावसाहेब चव्हाण, तानाजी चव्हाण, राजेंद्र पाटील, सालविठ्ठल, छगन चव्हाण, दिलीपराव रणदिवे, तुषार चव्हाण आदींसह कारखान्याचे सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखान्याचे चेअरमन आमदार श्री भारतनाना भालके म्हणाले की, कारखान्याच्या उभारणीपासून आत्ता पर्यंतची ही 8 वी निवडणुक आहे. तालुक्यातील इतर कारखान्यांच्या निवडणुका ह्या बिनविरोध होतात मात्र विठ्ठल परिवारातील संस्थांच्या निवडणुका जाणुन-बुजून लावल्या जातात याचाही विचार आता शेतकर्यांनी करण्याची वेळ आली आहे. कै.औदुंबरआण्णा पाटील यांच्यापासून ते आजपर्यंतच्या काळात कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी व इतर प्रकल्पासाठी कर्ज घ्यावे लागले आहे. यापुर्वी घेतलेल्या कर्जांची त्या-त्या काळात परतङ्गेड केली आहे. संस्थेचा विकास करीत असतांना कर्ज हे घ्यावेच लागते. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी कर्ज घेऊनच आपली प्रगती केली आहे. त्यामुळे विरोधकांनी कारखान्यावर कर्ज केले असल्याचा आरोप हा खोटा असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी श्री रामदास चव्हाण यांनी स्वागत केले तर श्री दिनकर पाटील, छगन चव्हाण यांनी कारखान्याच्या प्रगतीविषयी माहिती दिली. त्यानंतर देगांव, अजनसोंड, मगरवाडी येथेही प्रचारसभा घेण्यात आल्या या सभांनाही शेतकरी/सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.