जळीतग्रस्ताला १0 हजारांची मदत
खेडभाळवणी (ता. पंढरपूर) येथील घरगुती गॅस सिलिंडर स्फोटातील नुकसानग्रस्त सिद्धेश्वर साळूंखे यांना मदत सुपूर्द करताना कल्याणराव काळे, सोबत नंदकुमार बागल, बिभिषण पवार, अनंता घालमे आदी. पंढरपूर : खेडभाळवणी (ता. पंढरपूर) येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेतील नुकसानग्रस्त कुटुंबीयांना भेट देऊन सहकार शिरेामणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षकल्याणराव काळे यांनी दहा हजार रुपयांची रोख मदत दिली. खेडभाळवणी (ता. पंढरपूर) येथील सिद्धेश्वर जगन्नाथ साळुंखे यांच्या पत्र्याच्या घरातील घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन घरातील सर्व चीज वस्तू व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सिलिंडरच्या स्फोटाने घराच्या छताचे पत्रे उचकटले. घरातील भांडीकुंडी, सर्व कपडे, शिधा सामुग्री जळून खाक झाल्याने साळुंखे कुटुंबीय रस्त्यावर आले.
या दुर्घटनेचे वृत्त समजताच गावातील विठ्ठलचे संचालक बिभिषण पवार, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे उपाध्यक्ष शहाजी साळुंखे, राजेंद्र पवार, गजेंद्र पवार, शहाजी पवार, मच्छिंद्र पवार, लक्ष्मण साळुंखे, अनंता घालमे, संभाजी पवार, सरपंच जयसिंग मस्के यांनी एकत्रित येऊन नुकसानग्रस्त कुटुंबीयांना २५ हजारांची रोख लोकवर्गणी जमा करुन संसारोपयोगी साहित्य दिले.
यानंतर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, संचालक मोहन नागटिळक, कार्याध्यक्ष नंदकुमार बागल यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबप्रमुख सिद्धेश्वर साळुंखे यांना दहा हजारांची रोख मदत दिली.