अभिनेत्री राणी मुखर्जीला कन्यारत्न.... मुलीचे नांव ‘आदिरा’
मुंबई : चोप्रा आणि मुखर्जी कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अभिनेत्री राणी मुखर्जीने एका मुलीला जन्म दिला आहे. ब्रिच कँडी रुग्णालयात राणीची डिलीव्हरी झाल्याचं वृत्त आहे. अभिनेता रितेश देशमुखने आणि ऋषी कपूर ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे.
मुलीचं नाव आदिरा ठेवण्यात आलं आहे. आदित्य आणि राणी यांच्या नावाच्या संगमातून आदिरा’ हे नाव ठेवल्याचं समजतं. पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी 2016 मध्ये राणी आणि आदित्य चोप्रा यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची अपेक्षा होती. मात्र खबरदारी म्हणून राणीला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिची रवानगी ब्रीच कँडीमध्ये झाली. दिवाळीमध्ये बच्चन यांच्या घरी झालेल्या सेलिब्रेशनमध्ये राणी सहभागी झाली होती. त्यावेळी गर्भवती राणीसोबतचा सेल्फी अभिनेत्री प्रिती झिंटाने शेअर केला होता. त्यानंतर राणीला बेडरेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. दिग्दर्शक आदित्य चोप्रा रणवीर सिंग आणि वाणी कपूरसोबत आगामी बेफिक्रे चित्रपटाच्या तयारीत गुंतला होता. राणीला जानेवारी महिन्याची डेट दिल्याने तिला सरप्राईज गिफ्ट म्हणून जानेवारीतील जवळपासच्या शुक्रवारी सिनेमा प्रदर्शित करण्याचा त्याचा मानस होता. 21 एप्रिल 2014 रोजी मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत राणी आदित्य चोप्राशी विवाहबद्ध झाली होती. राणीचे ब्लॅक, युवा, हम-तुम, नो वन किल्ड जेसिका, मर्दानीसारख्या चित्रपटांतील भूमिका विशेष गाजल्या होत्या. अभिनयाच्या जोरावर एक काळ मोठा पडदा गाजवणारी अभिनेत्री राणी मुखर्जी लग्नानंतर काहीशी गायब झाली.