ग्रामीण साहित्यीक अंकुश गाजरे यांना पुरस्कार

पंढरपूर लाईव्ह प्रतिनिधी:-
               
           पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील ग्रामीण साहित्यीक अंकुश गाजरे यांना संग्रामसिंह डोंगरे प्रतिष्ठान, शेटफळ (ता.पंढरपूर) यांच्या वतीने देण्यात येणारा ’सारस्वत साहित्य गौरव’ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
           सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार 11 डिसेंबर रोजी जेष्ठ पत्रकार अरुण खोरे,मनोहर डोंगर आदींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

श्री.गाजरे हे ग्रामीण भागात अतिशय खडतर परिस्थितीतून मार्ग काढत शिकले.... ग्रामीण मातीतच वाढले... फुलले... त्यांच्या साहित्याचे बीज रानाच्या मातीतच रुजलेले म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या साहित्यामध्ये अस्सल ग्रामीण मातीचा  सुगंध दरवळताना जाणवतो. अशा या नवग्रामीण साहित्यीकाच्या कार्याची पोहोच या पुरस्काराच्या रुपाने मिळत असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
            पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.गाजरे यांचे प्रा.राजेश पवार, प्रा. ज्योतीराम गायकवाड, प्रा.आसबे, समाधान गाजरे आदींनी अभिनंदन केले.